Home क्राईम मनपाच्या पथकाकडून राणा दाम्पत्याच्या फ्लॅटची तपासणी

मनपाच्या पथकाकडून राणा दाम्पत्याच्या फ्लॅटची तपासणी

0
26

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | अमरावतीचे राणा दाम्पत्याचा खार येथील इमारतीतील फ्लॅटचे बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस मुंबई महापालिकेने दिली होती. त्यानुसार आज मुंबई महापालिकेचे अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात असून अन्य रहिवाशांना देखील नोटीस देण्यात आली आहे.

अमरावतीच्या खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांचा मुंबईत खार परिसरातील लाव्ही इमारतीत आठव्या मजल्यावर फ्लॅट आहे. खारमधील फ्लॅटमध्ये राणा दाम्पत्याने अनधिकृत बांधकाम केले असल्याचा दावा मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यासंदर्भात नोटीस देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बजावली होती.

त्यानंतर आज मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांचे पथक लाव्ही इमारतीत राणा दाम्पत्याचा फ्लॅटची तपासणी करण्यात आली. संबंधित पथकाकडून इमारतीच्या गॅलरीचे गॅलरीचं मोजमाप करीत इतर बांधकामाचे फोटो देखील काढण्यात आले असून राणा दाम्पत्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित इमारतीत राहणाऱ्या अन्य रहिवाशांना देखील नोटीस बजावली आहे. ठरवलेल्या आराखड्यानुसार आणि महापालिकेने दिलेल्या मंजुरीनुसारच या इमारतीचे बांधकाम झाले आहे किंवा नाही याची पडताळणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली.


Protected Content

Play sound