चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील ओढरे येथील ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन तर्फे चाळीसगांव शहर वाहतुक पोलिसांचा कोरोना योद्धा म्हणून ५ फेब्रुवारी रोजी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.
संपुर्ण देशाला कोरोनाने हतबल करून ठेवलेले असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वाहतुक पोलीस सेवेतील कर्मचार्यांना कोरोनायोध्दा म्हणून ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन तर्फे चाळीसगांव शहर वाहतुक पोलिसांचा कोरोना योद्धा म्हणून आज सन्मानीत करण्यात आले. कोरोना सारख्या भयावह काळात सेवा बजावल्याच्या पार्श्वभूमीवर संस्थेचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी सन्मानीत केल्याचे सांगितले.
या कोरोना योद्धा सन्मानाने सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर पो.कॉ. वंदना राठोड, सचिन अडावदकर, अरुण बाविस्कर, राजीव मगर, नरेंद्र पाटील, दीपक पाटील, विजय निकम, राजेंद्र निकम, हेमंत शिरसाठ, राजेश रावते, प्रशांत पाटील, मुकेश बिऱ्हाडे, दिलीप सोनवणे, बापू पाटील, आबा पाटील, राजेंद्र चित्ते, शांताराम थोरात, सुनील खैरनार, विजय पाटील, भास्कर भोसले, दीपक जगताप, राजेंद्र जाधव, मोतीलाल चौधरी, एस. पी.बोरसे, चक्रधर पवार, अरुण बाविस्कर, व सफाई कामगार सुनील नकवाल यांना गौरविण्यात आले.या प्रसंगी प्रमुख उपस्थिती साहित्यिक एकनाथ गोफने, शेतकरी बचाव कृती समिती अध्यक्ष अॅड. भरत चव्हाण, देवेंद्र नाईक, करगाव विकास सोसायटीचे चेअरमन दिनकर राठोड, अनिल चव्हाण, रुपसिंग जाधव ,अविनाश राठोड , भीमराव जाधव , विलास जाधव , चिंतामण चव्हाण आदी उपस्थित होते. याप्रसंगी सूत्रसंचालन व आभार अशोक राठोड यांनी व्यक्त केले.