पारोळा प्रतिनिधी । येथील राणीलक्ष्मीबाई महाविद्यालयात प्राचार्य डी.आर.पाटील,उपप्राचार्य तथा क्रीडा संचालक संजय भावसार यांच्यासह क्रीडा विभागाचे पथकातील पंधरा विद्यार्थ्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे सन्मानित करण्यात आले.
राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातील (आर एल कॉलेज) प्राचार्य डी आर पाटील,उपप्राचार्य संजय भावसार यांच्यासह क्रीडा विभागातील पथकाने कोरोनाच्या भयावह स्तिथीत शहरामध्ये वाहतूक व गर्दी नियंत्रण, बँक गर्दी नियंत्रण करण्यासाठी सोशल डिस्टन्स व पोलीस प्रशासनला मदत करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय बागडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हासरचिटणीस सुवर्णा पाटील,प्राचार्य डी. आर.पाटील ,उपप्राचार्य संजय भावसार ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश रोकडे ,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हासरचिटणीस लोकेश पवार ,राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाउपाध्यक्ष मयूर शिंदे, राष्ट्रवादी विद्यार्थी शहर सरचिटणीस धिरज चौधरी,विवेक जाधव,विजय राठोड, सिद्धूराज महाजन उपस्थित होते.