जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्या कमी होतांना दिसून येत आहे. जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १६४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ५६० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
जिल्ह्यातील आजची आकडेवारी
जळगाव शहर-१८, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-३२, अमळनेर-१, चोपडा-५, पाचोरा-३५, भडगाव-१, धरणगाव-०, यावल-२, एरंडोल-२, जामनेर-५, रावेर-११, पारोळा-६, चाळीसगाव-२६, मुक्ताईनगर-१५, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १६४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४० हजार ३०६ बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी १ लाख ३३ हजार ९ रूग्ण बरे होवून घरी पतरले. तर ४ हजार ७५८ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात ४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.