Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज आढळले दोन पॉझिव्हिट रुग्ण

कोरोना : जिल्ह्यात आज आढळले दोन पॉझिव्हिट रुग्ण

0
22

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार आज दिवसभरात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर एक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ८१० बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी १ लाख ४० हजार २२५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

यात चोपडा येथील आमदार लताताई सोनवणे यांचा समावेश आहे. त्यांना कोरोनाची लागण झालेली असून त्यांच्या कुटुंबियांचा अहवाल मात्र निगेटीव्ह आलेला आहे.

 


Protected Content

Play sound