कोरोना : जिल्ह्यात आज २ संक्रमित रूग्ण आढळले; ४ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकुण २ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ४ रूग्ण कोरोनामुक्त झाली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रान्वये कळविले आहे. 

अहवालानुसार पाचोरा आणि बोदवड तालुक्यात प्रत्येकी १ असे एकुण दोन बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर उर्वरित सर्व तालुका निरंक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६७५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ७० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३० बाधित रूग्ण जिल्ह्यातील विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आजवर  जिल्ह्यात एकुण २ हजार ५७५ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

 

Protected Content