रावेर प्रतिनिधी । रावेर ग्रामीण भागात कोरोना व्हायरसची ब्रेक दि चैन करण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाने कंबर कसली आहे. या अंतर्गत नुकताच आदिवासी भागातील आभोडा येथे कोरोना टेस्ट कॅम्प घेण्यात आल्याची माहीती गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी दिली.
रावेर तालुक्यात कोरोना व्हायरसची ब्रेक दि चैन करण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाने गावा-गावात कॅम्प घ्यायला सुरुवात केली आहे. जनतेनी स्वतः ची जबाबदारी समजून गावात सर्दी, ताप, खोकला सदृश्य पेशंट आढळल्यास त्यांनी तात्काळ कोरोना टेस्ट कॅम्पमध्ये जाऊन अँटीजन टेस्ट करून घेण्याचे अवाहन गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी रावेर ग्रामीण भागातील जनतेला केले आहे.