मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर-कोथळी कोरोनाचा वाढता प्रभाव बघता मुक्ताईनगर शहरालगत कोथळी गावामध्ये तहसीलदार श्वेता संचेती, तालुका वैद्यकीय अधिकारी. निलेश पाटील, तसेच डॉ. योगेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना रॅपिड टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये गावकऱ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे.
रॅपिड टेस्ट करताना जो कोणी रुग्ण पॉझिटिव मिळत आहे त्याला त्वरित उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे पुढील वैद्यकीय उपचारासाठी ॲम्बुलन्स च्या साह्याने पाठवत आहे. त्यासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील कर्मचारी, सामुदायिक वैद्यकीय अधिकारी पल्लवी तळेले, तसेच कोथळी गावचे सरपंच. नारायण चौधरी. ग्रामसेवक मनोहर रोकडे. आरोग्य सहाय्यक. विजय पाटील, आरोग्य सेवक .आर आर सुरवाडे. व आर आर ठोंबरे अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व रुग्णवाहिकेचे चालक . योगेश पाटील व गोपी टोंगळे यांच्या साह्याने आतापर्यंत 100/120 लोकांचे रॅपिड टेस्ट करण्यात आले आहे.
कोथळी गावाचे पोलीस पाटील. संजय चौधरी यांनी सर्व जनतेनी आपली रॅपिड टेस्ट करून घ्यावी असे आवाहन केले आहे.