कोरोनाचा उद्रेक : जिल्ह्यात आज नव्याने २२१ रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात २२१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरासह भुसावळ आणि चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावार कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत आहे.

 

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण २२१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर-४३, जळगाव ग्रामीण-४, भुसावळ-१०७, चोपडा-३२, पाचोरा-५, एरंडोल-५, पारोळा-२, चाळीसगाव-१४, मुक्ताईनगर-१, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण २२१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाखप ४३ हजार ६०७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २६१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आता ७६७ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Protected Content