Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज एकही रूग्ण आढळला नाही; २ रूग्ण झाले बरे

कोरोना : जिल्ह्यात आज एकही रूग्ण आढळला नाही; २ रूग्ण झाले बरे

0
29

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रुग्णालयाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात दिवसभरात एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही तर दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्‍हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यात आज एकही रुग्ण आढळून आला नसल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 737 बाधित रुग्ण आढळून आले आहे. यापैकी 1 लाख 40 हजार 158 रुग्ण बरे होऊन घरी परतला आहे. त्याचप्रमाणे 2 हजार 575 रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या चार रुग्ण ॲक्टिव्ह असून आज २ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

 

 


Protected Content

Play sound