जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार दिवसभरात एकही रूग्ण आढळून आला नाही. तर दोन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. तर बाधित असलेले दोन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७३१ बाधित रूग्ण आढळून आले आहे त्यापैकी १ लाख ४० हजार १३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात २ हजार ५७५ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यात १८ बाधित रूग्ण असून विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.