नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढतच असतांना गत चोवीस तासांमध्ये देशभरात तब्बल १ लाख ६१ हजार रूग्ण आढळून आले आहेत.
देशात कोरोनाचा धोका वाढला असून आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 1,36,89,453 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,61,736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 879 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,36,89,453 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (13 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 1,61,736 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 71 हजारांवर पोहोचला आहे.