जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात २१७ नवीन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून यात जळगाव शहरातील ९८ रूग्णांचा समावेश आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांबाबतची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज जिल्ह्यामध्ये २१७ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक २१७ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. यामुळे शहरातील रूग्ण संख्या वाढीस लागली असून यात कमी येत नसल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, आजच्या रिपोर्टमध्ये एरंडोल-२३; भुसावळ-१६; चोपडा-११; रावेर-१६; चाळीसगाव व अमळनेर- प्रत्येकी १०; पाचोरा-५; जळगाव ग्रामीण-३; यावल-५; जामनेर-१२; पारोळा, मुक्ताईनगर व बोदवड-प्रत्येकी १; आणि बाहेरच्या जिल्ह्यातील १ अशी अन्य रूग्णांची संख्या आढळून आली आहे.
आजच्या आकडेवारीने जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही ७४९२ इतकी झाली आहे. यातील ४६५२ इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात आजच २३४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर ३८१ रूग्णांचा मृत्यू झाला असून २४५९ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती या प्रेस नोटमध्ये दिलेली आहे.