एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील ११ गावांचे ग्रामसेवक कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्रामविकासाच्या कामांसह ग्रामपंचायतीच्या कामांना ब्रेक लागला असून कामे ठप्प झाले आहे.
एरंडोल तालुक्यातील सावदे प्र.चा, पिंपळकोठा प्र.चा., भालगाव, टोळी, आनंदनगर, गालापूर, सोनबर्डी, पिंपळकोठा बुद्रुक, पिंपळकोठा खुर्द, भातखेडे, जवखेडे सिम या गावांचे ग्रामसेवक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे ग्रामविकासाच्या कामांसह ग्रामपंचायतींची दैनंदिन कामे ठप्प झाले आहेत. एरंडोल तालुक्यात 51 ग्रामपंचायतींची संख्या असून, ग्रामसेवक 30 आहेत. एका ग्रामसेवक आकडे 2 ते 3 ग्रामपंचायतींचा कारभार सोपविण्यात आला आहे. कोरोना संदर्भातील उपायोजना, पाणीटंचाई, जन्म-मृत्यूचे दाखले, कर वसुली, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, साफसफाई, आरोग्य, जन्म-मृत्यूची नोंद, गटारी, रस्ते व घरकुलांची कामे, इत्यादी विकास कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे गावाच्या विकासाला ब्रेक लागला आहे. विशेष हे की काही ग्रामसेवकांच्या पूर्ण परिवाराला कोरोनाने विळखा घातला आहे.