Home Cities जळगाव एमआयडीसीतील स्पेक्ट्रम कंपनीतून कॉपर पट्ट्यांची चोरी !

एमआयडीसीतील स्पेक्ट्रम कंपनीतून कॉपर पट्ट्यांची चोरी !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील जी-सेक्टरमध्ये असलेल्या स्पेक्ट्रम कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीच्या ४० किलो कॉपरच्या पट्ट्या चोरून नेल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणी रविवार, १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी १५ ते १६ ऑगस्टच्या मध्यरात्रीदरम्यान घडली असावी. स्पेक्ट्रम कंपनीमधून चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीच्या कॉपरच्या पट्ट्या लंपास केल्या. कंपनीच्या व्यवस्थापनाला चोरी झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

या घटनेसंदर्भात कंपनीचे व्यवस्थापक बाळू पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे एमआयडीसी परिसरातील कंपन्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound