दिव्यांग प्रमाणपत्रासाठी विविध रेल्वेस्थानकावर सुविधा

19 railway 201902197880

भुसावळ (प्रतिनिधी )  भुसावळ-मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात आता  दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्रासाठी भुसावळ विभागीय व्यवस्थापक कार्यालयात अर्ज जमा करण्यासाठी जाण्याची आवश्यकता नाही.  त्यांच्यासाठी विविध स्थानकांवर अर्ज जमा करण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिल्याची माहिती भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आली आहे.

 

दिव्यांग व्यक्तीना ओळखपत्राचे अर्ज जमा करण्यासाठी नाशिक, खंडवा, बऱ्हाणपूर, खामगाव, अकोला, अमरावती, धुळे,  यवतमाळ  व मलकापुर या रेल्वे स्थानकावर मुख्य आरक्षण पर्यवेक्षक कार्यालयात जमा करता येणार आहे.  दिव्यांग ओळखपत्रासाठी खालील कागदपत्रे  आरक्षण कार्यालयात अर्ज, दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड , जन्म तारीख प्रमाण पत्र,  रेल्वे सवलत प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट फोटो, अर्जदाराचा संपर्क क्रमांक ही कागदपत्रे स्वयं प्रमाणित करून वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक भुसावळ यांच्या नावाने उपरोक्त विविध स्थानकाच्या  मुख्य आरक्षण कार्यालयात जमा करता येणार आहे.  रेल्वे विभागाच्या या सुविधेमुळे दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे

Add Comment

Protected Content