भुसावळ (प्रतिनिधी) रेल्वे प्रवाशी अनारक्षित तिकिट प्लेटफ़ॉर्म तिकिट आणि मासिक पास तिकिट (MST) मोबाईल मधल्या युटीएस अॅपद्वारा आता खरेदी करू शकणार आहेत. पहिले या पध्द्तीमध्ये फक्त तिकिट बुक करून त्याची प्रिंट रेल्वे स्टेशनच्या एटीएमद्वारे किंवा तिकिट खिडकीवर तिकीट घ्यावी लागत होती. परंतु 12 आक्टोंबर 2018 पासून युटीएस अॅपद्वारा पेपरलेस तिकिटाची सुविधा रेल्वेद्वारा सुरु करण्यात आलेली आहे.
आता तुम्हाला तिकिटाची प्रिंट घेण्यासाठी एटीएम किंवा तिकिट खिडकीवर लाईन लावण्याची गरज नाहीय. कारण प्रवाशांनी युटीएस मोबाईल अॅपचा जास्तीत जास्त उपयोग केल्यास त्यांची ही अडचण सुटणार आहे. प्रवाशी आता आपले तिकिट घरबसल्या बुक करू शकतात. त्यामुळे वेळ वाचेल आणि तिकिट मोबाईलमध्येच असल्यामुळे हरवण्याची किंवा गहाळ होण्याची शक्यताच राहणार नाही. आधी ही सुविधा भुसावळ मंडळच्या भुसावळ स्टेशनवर उपलब्ध होती. परंतू आता पेपरलेस तिकिट सुविधा झाल्यामुळे भुसावल मंडळ अंतर्गत येणाऱ्या 81 स्टेशनवरुन या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
प्रवाशांनी असा करावा मोबाईल अॅप उपयोग
रेल्वे प्रवाशानी प्रथम ‘प्ले स्टोर’मधून युटीएस मोबाईल तिकीट अॅप डाउनलोड करुन घ्यावे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर रजिस्ट्रेशन करुन घ्यावे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मोबाईल नंबर, नाव, शहर, गाडीचा प्रकार,श्रेणी आणि कोणते तिकिट पाहिजे ही माहिती फीड करावी. रजिस्ट्रेशनच्या नंतर अॅपमध्ये रेल्वे वॉलेट होईल. यानंतर आपण वॉलेट मनी लोड केल्यावर तिकीट बुकिंग करता येईल किंवा क्रेडिट /डेबिट कार्डचा सुध्दा वापर करता येईल. या अॅपद्वारे तिकिट बुक केल्यानंतर रद्द करता येत नाही. त्याचप्रमाणे अॅडव्हांस तिकिट बुकिंगसुध्दा करता येणार नाही. या सुविध्येचे नेटवर्क स्टेशन पासून पाच किलोमीटरच्या आत मिळेल. पण रेल्वे रुळाच्या 25 मिटरच्या आत हे नेटवर्क मिळणार नाही. या अॅपचा उपयोग करुन प्रवाशांची तिकिट काढण्याच्या रांगे पासून सुटका होईल. त्याचबरोबर प्रवास पेपरलेस होईल. अर्थात पेपर तिकीट खरेदी करण्याची आवश्यकता नाही. नागरिकांना या युटीएस मोबाईल अॅपचा उपयोग करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.