रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | किरकोळ कारणावरून मजुरांच्या वादात एकाने विळ्याने वार करून एका युवकास गंभीर जखमी केल्याची घटना काल रोजी तालुक्यातील के-हाळे येथे घडली याबाबत रावेर पोलीस ठाण्यात सात जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबतचे वृत्त असे की केऱ्हाळे येथील प्रिंपी रस्त्यावरील जय भोले तोल काट्यावर केळीने भरलेल्या वाहनाचा वजन काट्यावर आधि वजन करण्याच्या कारणावरून .विकी यशवंत वाघ रा . आहिरवाडी व रियाज रफिक तडवी यांच्यात वाद झाला . हा वाद वाढत जाऊन विकी याने रियाज (वय १८) यास मानेवर विळ्याने मारून प्राणघातक हल्ला केला . तसेच गणेश देविदास वाघ, विशाल खुशाल गोमटे, नितीन गोमटे, करण तायडे, सिद्धार्थ भालेराव, मंगल पाटील यांनी फिर्यादी सबदर तडवी व रियाज यास चापटा बुक्यांनी मारहाण केली . या बाबत सबदर हैदर तडवी रा . भोकरी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून सात जणांविरुद्ध प्राणघातक हल्ला व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास उपनिरिक्षक तुषार पाटील करीत आहेत .