बारामतीत बैलगाडा शर्यतीत वाद; गोळीबारात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बारामती तालुक्यातील निंबुत येथे झालेल्या सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी बैलाच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारावरून गुरूवारी रात्री गोळीबार झाला होता. यात फलटण येथील रणजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते. निंबाळकर यांच्यावर पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान निंबाळकर यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शहाजीराव काकडे, गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, गौतम काकडे सध्या फरार असून बारामती पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

शर्यतीचा बैल खरेदी करण्याच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादातून गोळीबार झाला. या गोळीबारात रणजीत निंबाळकर हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. या संदर्भात अंकिता रणजीत निंबाळकर यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये गौतम शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे आणि तीन अनोळखी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीनुसार एक वर्षांपूर्वी सर्जा हा बैल निंबुत येथील गौतम काकडे यांच्याकडून 61 लाख रुपयांना रणजित निंबाळकर यांनी विकत घेतला होता. त्यानंतर 24 जून 2024 रोजी रणजीत निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम शहाजी काकडे यांनी 37 लाख रुपयांना विकत घेतला. यावेळी गौतम काकडे यांनी विसारापोटी पाच लाख रुपये दिले होते. उर्वरित 32 लाख रुपये येणे बाकी होते. दरम्यान, व्यवहार झाला, त्याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर हा बैल खटाव तालुक्यातील बुध येथून त्यांच्या घरी निंबुतला नेला. उर्वरित पैसे आणण्यासाठी गेले असताना त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यावरून रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. रंजीत निंबाळकर यांच्यावरती पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Protected Content