मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवर्यात सापडलेल्या आयएएस अधिकारी यांच्या कारनाम्यांची गंभीर दखल घेण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण थांबविण्याचे निर्देश आज जारी करण्यात आले आहेत.
पूजा खेडकर यांची प्रत्येक दिवसाला वेगवेगळे कारनामे समोर येत असून त्यांचे आई व वडील हे देखील वादग्रस्त प्रकरणांमध्ये आढळून आले आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले असून ते सध्या फरार झालेले आहेत. तर दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या कृत्यांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यांनी तातडीने आयएएस अधिकारी म्हणून सुरू असलेले प्रशिक्षण थांबवून मसुरी येथील लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकॅडमीमध्ये हजर व्हावे असे निर्देश आज जारी करण्यात आले आहेत.
पूजा खेडकर यांना २३ जुलै पर्यंत मसुरी येथे हजर राहण्यास सांगण्यात आले असून येथे त्यांच्याबाबत सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाईची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. यामुळे आता या प्रकरणी पुढे नेमके काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.