Home Cities जळगाव समाजासाठी योगदान हेच सर्वश्रेष्ठ दान – राजेंद्रसिंह राजपूत

समाजासाठी योगदान हेच सर्वश्रेष्ठ दान – राजेंद्रसिंह राजपूत

0
133


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समाजासाठी दिलेले योगदान कधीही व्यर्थ जात नाही, समाज त्याची किंमत नक्कीच करतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह राजपूत यांनी जळगाव येथील राजपूत समाज उन्नती सभागृहात केले. समाजासाठी योगदान देणाऱ्यांचे कौतुक करत त्यांनी समाजाच्या एकजुटीवर आणि कार्यावर भर दिला. या बैठकीत समाजाच्या प्रगतीसाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या.

राजपूत समाजाची जिल्हा बैठक उत्साहात
जळगाव जिल्ह्यात अखिल भारतीय क्षत्रिय महासभेची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाची सुरुवात महाराणा प्रतापसिंहजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह राजपूत होते. यावेळी त्यांनी समाजातील सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी समाजाच्या प्रगतीसाठी आपले विचार मांडले आणि सामाजिक कार्याला प्रोत्साहन दिले.

विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
या बैठकीत संघटनेच्या विविध पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह राजपूत आणि पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. महाराष्ट्र कोषाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष सतीश गौर, महाराष्ट्र उद्योग अध्यक्षपदी जीवनसिंग बायस, महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी सौ. तिलोत्तमा मौर्य राजपूत, महाराष्ट्र इ.प्र. अध्यक्षपदी डॉ. दिपकसिंग राजपूत, प्रदेश महिला सचिवपदी शालिनी पाटील, जळगाव जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी विद्या पाटील, महाराष्ट्र विधी अध्यक्षपदी ॲड. अमोल परदेशी आणि महिला प्रदेश संघटकपदी सौ. अनिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी सौ. विद्या पाटील, उपाध्यक्षपदी सौ. रोशना गिराशे, संघटकपदी सौ. इंदूबाई राजपूत आणि कार्याध्यक्षपदी पंकजसिंह बायस यांची निवड करण्यात आली.

युवकांना संधी
या बैठकीत धरणगाव युवक तालुका अध्यक्षपदी मुकेशसिंह राजपूत आणि तालुका अध्यक्षपदी मुकेशसिंह बायस यांचीही नियुक्ती करण्यात आली. तसेच, जळगाव जिल्हा संघटकपदी विवेक पाटील, सचिवपदी कमल पाटील, भडगाव तालुका अध्यक्षपदी भरतसिंग पाटील (पिंपळखेड) यांची निवड करण्यात आली. वर्षा राजपूत, छाया राजपूत, उषा परदेशी, विजय गहेरवार, प्रफुल चंदेल, गोविंदसिंग जनकवर, ॲड. रवींद्रसिंग पाटील, दिलीपसिंग पाटील, अमोल पाटील, प्रदीपसिंग गिराशे, अतुलसिंग राजपूत (अमरावती), जीवन सिसोदे आणि क्रांती पाटील यांनाही विभागीय कार्यकारणीत स्थान देण्यात आले आहे. या सर्व नियुक्त्या जून २०२८ पर्यंत राहणार असल्याचे राजेंद्रसिंह राजपूत यांनी सांगितले.

सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन
प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह राजपूत यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सामाजिक कार्य करताना सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशना गिराशे यांनी केले, तर प्रास्ताविक शालिनी पाटील यांनी केले. डॉ. दीपकसिंग राजपूत, तिलोत्तमा मौर्य आणि जीवनसिंग बायस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound