चाळीसगाव प्रतिनिधी । धुळेकडून चाळीसगावकडे भरधाव वेगाने येत असलेला कंटेनरने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या धडकेत एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना चिंचगव्हान फाट्याजवळ घडली असून याप्रकरणी मेहूनबारे पोलीसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती, धुळे कडून चाळीसगावकडे येणार्या भरधाव कंटेनरने (क्र. एम.एच.०४ गेलं ४३१३) कांद्याचा भरलेला ट्रॅक्टरला (क्र. एम.एच.४१ जे ५८११) दि. २५ रोजी दुपारी १२:३० सुमारास जोरदार धडक दिली. या घटनेत बारकू राजेंद्र सोनवणे याचे जागीच मृत्यू झाले. तर रामा सोनवणे याच्या उजव्या हाताला तर राहूल दादाजी पवार याच्या छातीला जबर दुखापत झाली. हि घटना दि. २५ रोजी दुपारी १२:३० सुमारास चिंचगव्हान फाट्याजवळील लेंडी नाल्याजवळ घडली. अपघात घडतात कंटेनर चालकाने कंटेनर जागीच सोडून (अज्ञात) पसार झाला. याबाबत ट्रॅक्टर चालक दिपक दशरथ बोरसे (वय- २८ रा. अस्ताने ता. मालेगाव) याने मेहूणबारे पोलिसात भादवी कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, १३४ व १८४ अशा विविध कलमान्वये अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केले आहेत. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.