
container accident
जळगाव प्रतिनिधी । शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एक कंटेनर गतिरोधकामुळे दणका बसून मध्यभागून तुटल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील डॉ. विश्वेश अग्रवाल यांच्या हॉस्पीटलजवळून जाणार्या महामार्गावर अतिशय उंच असा गतिरोधक आहे. याचा वाहनधारकांना नेहमीच त्रास होत असतो. या पार्श्वभूमिवर, आज सकाळी एक अवजड कंटेनर वेगाने जात असतांना या गतिरोधकाचा जोरदार दणका बसला. यामुळे कंटेनर अगदी मधोमध तुटला. यात याचा मागचा भाग उंच झाला असून मागून येणार्या ट्रक चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे अपघात टळला. दरम्यान, रस्त्याच्या मध्यभागीच हा कंटेनर तुटून पडल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
पहा व्हिडीओ :