पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महायुती सरकारने महिलांचा सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना यांसह विविध योजनांचा यात समावेश आहे. ह्या योजना तळागळात पोहचवुन शेवट्या महिलेपर्यंत या योजनेचा लाभ व्हावा यासाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण संपर्क अभियानाची सुरूवात करण्यात आलेली आहे.
या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे संपर्क अभियान दि जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील व सौ.मृणालताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील मुंदाणे प्र.ऊ. येथे पार पडले. महायुती सरकारची ही योजना महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त व कल्याणकारी ही योजना आहे. आपणा राहत असलेल्या ठिकाणापासुन तर आपल्या संपर्कातील ठिकाणी आज देखील बऱ्याचशा माता-भगिणी या योजनेपासुन वंचित आहे. या माता-भगिणींना देखील या योजनेचा लाभ कसा मिळवुन देता येईल यासाठी आवश्यक तो पाठपुरावा आपण करून या पुण्य कर्माचे भागीदार तुम्ही होऊ शकतात.
आजच्या सुरू असलेल्या दैनंदिन युगात १५०० रूपये हे गोर-गरिब, सर्वसामान्य कुटुंबासाठी अत्यंत लाभदायी आहेत. यातुन भलतेच काही मोठे काम होते असे नाही, परंतु आपल्या दैनंदिन जिवनात याची आरोग्य, शिक्षण, संसारोपयोगी साहीत्य यांसाठी खारीचा वाटा म्हणुन हा लाभ महायुती सरकारकडुन महिलांना दिला जात. आपण येत्या काळात महायुतीला बळ दिल्यासा महिला अधिक सक्षम कशी होईल यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे अमोल पाटील यांनी सांगितले. प्रसंगी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे एरंडोल विधानसभा अध्यक्ष कुणालभाऊ महाजन, एरंडोल शहरसंघटक मयुर महाजन यांचेसह मुंदाणे ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासोचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, आदी मान्यवर व माता-भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.