यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बामणोद गावात महाराष्ट्र शासनाच्या नोंदणीकृत बांधकाम व्यवसायिक मजुरांसाठी भांडे वाटप कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या विशेष प्रयत्नातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध कार्यकारी सहकारी संस्था बामणोद येथे गेल्या महिन्यात ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती, अशा मजुरांना भांड्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात बामणोद, आमोदा, विरोदा व म्हैसवाडी येथील एकूण ३३१ नोंदणीकृत मजुरांनी लाभ घेतला. प्रत्येक लाभार्थ्याला कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भांडी देण्यात आली. या उपक्रमामुळे गरजू व कष्टकरी बांधकाम मजुरांना थेट लाभ मिळाला असून त्यांच्या कुटुंबासाठी उपयोगी येणारा आवश्यक साहित्य पुरवण्यात आला आहे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे महाराष्ट्र प्रदेश परिषद सदस्य हिरालाल चौधरी, जळगाव जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष शरद महाजन, बामणोद-न्हावी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, माजी पंचायत समिती सभापती डॉ. नरेंद्र कोल्हे, माजी सदस्य कलीमा सायबु तडवी, भाजप सरचिटणीस विलास चौधरी, तालुका अध्यक्ष उमेश बेंडाळे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष जयश्री चौधरी, सागर महाजन, नरेंद्र चौधरी, उमेश पाटील, सतीश चौधरी, म्हैसवाडीचे सरपंच सुजित चौधरी, मच्छिंद्र चौधरी, अनंत फेगडे, लताबाई मेढे, फैजपूर येथील शिवसेनेच्या पाटील ताई, प्रल्हाद केदारे, प्रशांत सरोदे, दीपक नेहते, चंद्रकांत तळले, दिनकर भंगाळे, हेमंत वारके व उमेश युवराज वाघुळदे आदींची उपस्थिती होती.
हा उपक्रम मजुरांसाठी फक्त आर्थिक मदत नसून त्यांच्या श्रमाचा सन्मान दर्शवणारा ठरला आहे. आमदार अमोल जावळे यांनी केलेल्या पुढाकारामुळे शासनाच्या विविध योजना गावागावात पोहोचवण्याचे कार्य बळकट झाले आहे. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत मजुरांच्या हितासाठी असे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.



