Home Cities जळगाव नूतन वर्षा कॉलनीत संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाला सुरुवात !

नूतन वर्षा कॉलनीत संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाला सुरुवात !

0
41

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मोहाडी रोड परिसरात असलेल्या नूतन वर्षा कॉलनीतील श्री विठ्ठल रुखमाई उद्यानाला संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाला रविवारी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

नूतन वर्षा कॉलनीतील श्री विठ्ठल रुखमाई मंदिराच्या बाहेरील मोकळ्या उद्यानाला संरक्षक भिंत आणि जाळी उभारण्याच्या १८ लाखांच्या कामाला मान्यता देण्यात आलेली आहे. रविवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते पूजा करून आणि नारळ वाढवून कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, ज्योती चव्हाण यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. कामाला सुरुवात होताच लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी मक्तेदाराला दिल्या आहेत.

 


Protected Content

Play sound