बीजिंग वृत्तसंस्था । चीनमधील जिनपिंग सरकारने आता उइगर मुस्लींमांची धार्मिक ओळख मिटवण्यासाठी मोहिम सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजाचे वास्तव्य असणाऱ्या शिनजियांग प्रांतातील अतुश सुंथग या गावातील एक मशीद पाडून तेथे चक्क सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलं आहे. इतर दोन ठिकाणीही मशिदी पाडण्यात आल्या आहेत.
चीनमधील जिनपिंग सरकारने आता उइगर मुस्लींमांची धार्मिक ओळख मिटवण्यासाठी मोहिम सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. यात उइगर मुस्लीमांच्या धार्मिक विधीवर बंदी घालण्यात आली आहे. अगदी टोपी घालण्यावर तसेच घरात कुराण ठेवण्यावरही सरकारने बंदी घातली आहे.
मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजाचे वास्तव्य असणाऱ्या शिनजियांग प्रांतातील अतुश सुंथग या गावातील एक मशीद पाडून तेथे चक्क सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलं आहे. इतर दोन ठिकाणीही मशिदी पाडण्यात आल्या आहेत.
अतुश सुंथग या गावामध्ये दोन वर्षांपूर्वी तीन मशिदी होत्या. त्यापैकी तोकुल आणि अजना मशीद पाडण्यात आली आहे. तोकुल मशिदीच्या जागी सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलं आहे.
२०१६ साली मशिदींची संख्या कमी करण्यासाठी आणि कट्टरतावादावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने मोहीम सुरु केली होती. या मोहिमेच्या नावाखील मशिदी, दर्गे आणि मुस्लिमांच्या स्मशानभूमी तोडण्यात आल्या आहेत.
अतुश सुंथग गावातील उइगर मुस्लीम कमिटीच्या प्रमुखांनी, “या गावातील प्रत्येक घरामध्ये शौचालय आहे. येथे फारसे पर्यटकही येत नाहीत. त्यामुळे मशीद पाडून त्याजागी शौचालय उभारण्याची गरज नव्हती,” असं मत व्यक्त केलं आहे.