मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरे येथील दलित समुदायातील बारा वर्षीय चिमुकलीवर काही नराधमांनी अपहरण करून तिच्यावर अमानुषपणे सामूहिक लैंगिक अत्याचार केला. त्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीच्या व एस.सी विभागाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
आज बुधवार, दि. २५ मे रोजी महाराष्ट्र राज्य गृहमंत्री वळसे पाटील साहेब यांना मुक्ताईनगर तहसीलदार यांच्यामार्फत मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीच्या व एस सी विभाग यांच्या वतीने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी. यासाठी निवेदन देऊन निषेध करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व्ही.जे.एन.टी. विभाग प्रदेश प्रवक्ता अॅड.अरविंद गोसावी, जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग जिल्हा उपाध्यक्ष बी. डी. गवई, मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अॅड.राहुल पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष एस सी विभाग निलेश भालेराव, संजय पाटील, रवींद्र जयकर आदी उपस्थित होते.