यावल प्रतिनिधी । पुढील आठवड्यात तालुक्यात होवु घातलेल्या ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक सार्वत्रीक निवडणुकीकरीता भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष जिल्हा कमेटीच्या वतीने ब्लॉक निहाय ३१ निवडणुक निरिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
यावल तालुक्यात दिनांक १५ जानेवारी २o२१ रोजी होणाऱ्या ४७ ग्रामपंचायतच्या सार्वत्रीक पंचवार्षीक निवडणुकीकरिता जळगाव जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष अॅड . संदीप भैय्या पाटील तालुका ब्लॉक निहाय निवडणुकीसाठी संपुर्ण जिल्ह्यात ३१ निवडणुक निरिक्षकांची निवड केली.
यावल तालुका निवडणुक व निरिक्षक म्हणुन सुरेश घनःशाम पाटील, सुर्यभान चौधरी यांची निवड केली. चोपडा विधानसभा क्षेत्रासाठी शेखर पाटील आणी भागवत पाटील, रावेर विधानसभा क्षेत्रासाठी भागवत पाटील, जगदीश पाटील, मुक्ताईनगरसाठी हितेश पाटील व राजेन्द्र श्रीनाथ, बोदवड करीता जलील पटेल, शेलेन्द्र नन्नवरे यांची तर भुसावळ साठी शंकर पाटील व जयदेव बोरसे, जळगाव ग्रामीण साठी देवेन्द्र मराठे व मुजीब पटेल, जामनेरसाठी विकास वाघ व प्रताप पाटील, चाळीसगावसाठी संजिव पाटील व अॅड. अमजद खान, भडगावकरीता राहुल मोरे, मिलींद साळवे व नितिन पाटील, पाचोरा करीता अशोक खलाणे व रमेश शिंपी,
एरंडोल साठी सुलोचना वाघ, शांताराम पाटील , धरणगावकरीता सुभाष पाटील व गिरीश पाटील , पारोळा करीता सुलोचना वाघ व शांताराम पाटील यांची निवड करण्यात आली असुन अमळनेर करीता सम्राट नितिनचंद्र परिहार आणी रामनाथ पाटील यांची निवड केल्याचे पत्र दिनांक ९ जानेवारी २o२१ रोजी पाठवलेआहे.