काँग्रेसचे बंडखोर आमदार खोसकरांचा अजित पवार गटात प्रवेश

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी आज सोमवारी अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी जिल्हा उपाध्यक्ष संपतनाना सकाळे, जनार्दन माळी,संदीप गुळवे, उदय जाधव, दिलीप चौधरी, मार्केट कमिटीचे माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने,माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक माळेकर, ज्ञानेश्वर कडू,जगन कदम इत्यादी नेत्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यासमवेत काँग्रेसचे ११ आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यात नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार हिरामण खोसकर यांचेही नाव पुढे आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणातही खळबळ उडाली होती. तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत मोठा दावा केला होता.

 

Protected Content