पाचोरा नंदू शेलकर । काँग्रेस पक्षाचे खासदार राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा काँग्रेस संकल्प सप्ताह साजरा करीत आहे. या सप्ताहात तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस पक्षाचे खासदार राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प सप्ताहात कॉंग्रेसतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातच आंदोलन देखील करण्यात येत आहे. आज पाचोरा कॉंग्रेस ने येथील तहसील कार्यालया समोर तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यात घोषणा देण्यात आल्या. राहुल को लाना है, देश को बचाना है”.. “किसान को बचाना है, राहुल को लाना है”… “वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारु महेंगा तेल”… या घोषणांनी तहसील कार्यालय दणाणले होते.
यावेळी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, जेष्ठ पदाधिकारी माजी पं. स. सभापती शेख इस्माईल शेख फकीरा, राजेंद्र महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, नंदकुमार सोनार, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, कृ. ऊ. बा. समिती प्रशासक प्रा. एस. डी. पाटील, महिला तालुका अध्यक्षा कुसुम पाटील, जिल्हा महीला पदाधिकारी अॅड. मनिषा पवार, संगीता नेवे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड अबांदास गिरी, प्रकाश चव्हाण, जिल्हा अल्पसंख्यक उपाध्यक्ष इरफान मनियार, आरोग्य सेवा सेल तालुका अध्यक्ष डॉ. फिरोज शेख, इस्माईल तांबोळी, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, कल्पेश येवले, शीला सुर्यवंशी, दिपक पाटील, शरीफ शेख, शंकर सोनवणे, समाधान पाटिल, गणेश पाटील, संजय सोनार, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.