रावेर प्रतिनिधी । रावेर प्रतिनिधी । आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
रावेरात कॉंग्रेस पक्षाचा मोचक्याच कार्यकर्तेंच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला. मेळाव्याला उशिरा उपस्थितीत राहिल्या बद्दल कॉग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी उपस्थितांची माफी व दिलगिरी व्यतीरीक्त जास्त बोलले नाही रावेरात पुन्हा लवकरच हजारोंच्या उपस्थितीत मेळावा घेण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थित पदाधिका-यांना दिले.
यावेळी मेळाव्यात आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, आगामी काळात कॉंग्रेस पक्षाच्या सुरु होणाऱ्या सदस्य मोहीममध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन मेळाव्या त्यांनी केले. यावेळी कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष योग्रेंद पाटील, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, माजी जिल्हाध्यक्ष राजिव पाटील, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, कॉंग्रेस शहर उपाध्यक्ष संतोष पाटील, राजु सवर्णे, डॉ. राजेंद्र पाटील, मानसी पवार, प्रतिभा मोरे, माजी जि. प. सदस्य कोकीळा पाटील, सावन मेढे, जगदीश घेटे, मुबारक तडवी, सौद शेख, यशवंत धनके, सुरेश पाटील, आर. एल. पाटील, अॅड. योगेश पाटील, दिलरुबाब तडवी, धुमा तायडे यांच्यासह आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी दौऱ्यावर असलेले प्रदेश उपाध्यक्ष आ.शिरीष चौधरी यांच्या होम ग्राउंडवर सायंकाळी मेळावा संपन्न झाला. आधीच कार्यकर्ता मेळाव्याला अडीच तास उशिराने सुरु झाल्याने मेळाव्याला अपेक्षित उपस्थिती नव्हती. मोजक्याच कार्यकर्ताच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला.