काँग्रेस नेते संदीप गुळवे यांचा ठाकरे गटात प्रवेश; नाशिक शिक्षक मतदारसंघात उमेदवारीही जाहीर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली असून 26 जून रोजी मतदान आणि 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. अशातच काँग्रेसचे नेते संदीप गुळवे यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. दोन्ही पक्षाच्या सहमतीतून संदीप गुळवे यांचा पक्षप्रवेश ठाकरे गटात झाला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत गुळवेंचा पक्षप्रवेश झाला. अन् त्यांना नाशिक मतदारसंघाची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे.

पक्षप्रवेशानंतर संदीप गुळवे म्हणाले की, माझा आज प्रवेश करून घेतला त्याबद्दल धन्यवाद देतो. आज माझा प्रवेश करून शिक्षकांची सेवा करण्याची संधी दिली आहे, माझी उमेदवारी जाहीर केली आहे. हा विश्वास मी सार्थ ठरवेल. नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा मी जिंकून आणून आणेल. ही संधी मला दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. अ‍ॅड. संदिप गुळवे यांचे शिक्षण बी.ए., एल.एल.बी. पर्यंत झालेले असून नाशिक जिल्हा परिषदेचे २०१२ ते २०१७ पर्यंत ते सदस्य होते. महाराष्ट्रातील बलाढ्य शिक्षण संस्था म्हणून लौकिक असलेल्या मराठा विद्या प्रसारक मंडळाचे ते संचालक आहेत. नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी कामगिरी बजावली आहे. जिल्ह्यातील विविध सहकारी, शिक्षण व कृषी संघटनांशी ते निगडीत आहेत.

Protected Content