Home Cities जळगाव जळगावात काँग्रेस प्रती नगरसेवक नेमणार

जळगावात काँग्रेस प्रती नगरसेवक नेमणार


जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नागरिकांचे महानगरपालिकेतील प्रश्न ,समस्या सुटाव्यात यासाठी जळगाव शहर जिल्हा कॉंग्रेसने पुढाकार घेऊन उपाय योजना आखली आहे, त्यासाठी कॉंग्रेस सर्व प्रभागात प्रती नगरसेवक (Shadow CORPORATOR) नेमणार आहे. ह्या प्रती नगरसेवकांच्या मदतीने शहर कॉंग्रेस संबंधित प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करणार आहे. त्यासाठी शहर भरातून अर्ज मागवले जाणार आहेत, अर्ज कॉंग्रेसच्या कार्यालयात दिनांक १७ फेब्रुवारी २०१९ पर्यंत सकाळी १० ते ६ या वेळेत उपलब्ध होतील. इच्छकांना नाव, वोटर कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर नोंदवून अर्ज घेता येतील.

 

‘जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटी’ या फेसबूक पेजवरही हा अर्ज डाउनलोड करून मिळेल.
हे सर्व अर्ज २० फेब्रुवारीपर्यंत जमा करता येतील. त्यावर शहर जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखालील समिती निर्णय घेऊन त्या-त्या प्रभागात प्रती नगरसेवकाची नेमणूक करणार आहे.समितीत माजी शहर जिल्हाध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे यांच्यासहित ज्येष्ठ पदाधिकारी असतील. अर्जदारांनी खालील महत्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक असेल.

१) त्या प्रभागातील रहिवाशी असावा अथवा प्रभागातून कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली असल्यास प्राधान्य.
२) नियुक्तीआधी कॉंग्रेसचे सक्रीय सदस्यत्व घेणे अनिवार्य राहील.
३) त्या प्रभागातील १० मतदार, रहिवाशी यांची नावे, मोबाईल, वोटर कार्ड क्रमांकासहित शिफारस असावी .
४) सदर उमेदवार मारामाऱ्या, विनयभंग, खून, भ्रष्टाचार अशा गंभीर गुन्ह्यांचा आरोपी नसावा किंवा तत्सम गुन्ह्यात शिक्षा झालेली नसावी .
५) सदर उमेदवार अवैध वाळू व्यवसायाशी सबंधित नसावा .
६) सदर उमेदवार मनपातील ठेके घेणारा नसावा . (तसे शपथपत्र द्यावे लागेल.)
७) जनतेच्या समस्यांचा पाठपुरावा, निरसन हे सर्व जनतेसाठी निशुल्क करावे लागेल .
सदर प्रती नगरसेवकांची नियुक्ती केल्यावर त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. ही नियुक्ती तीन महिन्यांसाठी असेल. या तीन महिन्यांच्या कामकाजाच्या अहवालानुसार पुढील नियुक्ती नियमित करण्यात येईल. त्यांचा एक संपर्क क्रमांक प्रभागात जाहीर करण्यात येईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound