मुंबई वृत्तसंस्था | राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून काँग्रेसमधील विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुटला आहे. अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव नक्की झालं आहे. ते उद्या विधानसभा अध्यक्षपदासाठीचा अर्जही भरतील असं सूत्रांनी सांगितलं.
उद्या सोमवार, दि.27 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार असून बुधवार, दि. 28 डिसेंबर रोजी अध्यक्षांची निवड होणार आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला आलेलं असून हे पद कोणाच्या वाट्याला येईल याविषयी अनेक तर्क लढवले जात होते.
काँग्रेस पक्षातून एकाचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, यासह भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा केली जात होती. मात्र, यात पृथ्वीराज चव्हाण यांची या पदासाठी निवड झाल्याचं वृत्त आहे.