Home राज्य काँग्रेसने सुप्रिया भारद्वाज यांची राष्ट्रीय माध्यम समन्वयक म्हणून नियुक्ती

काँग्रेसने सुप्रिया भारद्वाज यांची राष्ट्रीय माध्यम समन्वयक म्हणून नियुक्ती


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेसने ज्येष्ठ पत्रकार सुप्रिया भारद्वाज यांची राष्ट्रीय माध्यम समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. काही दिवसांपूर्वी राधिका खेर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रीय माध्यम समन्वयक पदाची जागा रिक्त होती.
सुप्रिया दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध प्रतिष्ठित माध्यम समुहांत काम केले आहे. जवळपास दीड दशकांहून अधिक काळ पत्रकारिता केल्यानंतर त्या काँग्रेसमध्ये सक्रीय झाल्या होत्या.


Protected Content

Play sound