नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी शुक्रवारी रात्री जाहीर केली असून, यामध्ये 18 उमेदवारांचा समावेश आहे. त्यात तेलंगणातील आठ, आसाममधील पाच, मेघालयातील दोन, उत्तर प्रदेश, सिक्कीम आणि नागालँडमधील एका उमेदवाराचा समावेश आहे.
काँग्रेसने यापूर्वी दोन याद्या जाहीर केल्या असून, सर्वाधिक उत्तर प्रदेशमधील उमेदवारांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री काँग्रेसने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांना सिलचरमधून, तर गौरव गोगई यांना आसाममधील कलियाबोर येथून उमेदवारी जाहीर केली आहे. हे दोघेही सध्या खासदार आहेत. उत्तर प्रदेशातील बाराबंकी मतदारसंघातून ज्येष्ठ नेते पी. एल. पुनिया यांचा मुलगा तनुज पुनियाला उमेदवारी देण्यात आली आहे. के. एल खिस्ती यांना नागालँडमधून आणि भारत बासनेत यांना सिक्कीममधून उमेदवारी जाहीर केली. तेलंगणामधून रमेश राठोड (दिलाबाद), ए. चंद्रशेखर (पेड्डापल्ले), पूनम प्रभाकर (करीमनगर), के. मदन मोहन राव (जहीराबाद), गली अनिल कुमार (मेडक), ए. रेवंथ रेड्डी (मल्कानगिरी), कोंडा विश्वेवर रेड्डी (चेवल्ला) आणि पोरिका बलराम नाईक (मेहबुबाबाद) यांना उमेदवारी देण्यात आली.