Home Cities जळगाव पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन (व्हिडिओ )

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन (व्हिडिओ )

0
32
WhatsApp Image 2019 07 10 at 4.06.35 PM
WhatsApp Image 2019 07 10 at 4.06.35 PM

WhatsApp Image 2019 07 10 at 4.06.35 PM

जळगाव (प्रतिनिधी): शहरातील गणेश कॉलनी येथील पेट्रोल पंपावर ग्राहकांना गुलाब पुष्प देऊन शहर काँग्रेस कमिटीतर्फे दरवाढीच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन करण्यात आले.

यावेळी केंद्र सरकारच्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या धोरणाविरोधात पेट्रोल पंपावर घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पेट्रोल भरून देण्याऱ्या कर्मचाऱ्यांना व पेट्रोल भरून घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाब पुष्प देऊन प्रतिकात्मक स्वरूपात दरवाढीचा निषेध करण्यात आला. डॉ. राधेश्याम चौधरी यांनी मोदी सरकारने उद्योगपतींचे हित रक्षणासाठी ही दरवाढ केली असल्याचा आरोप केला आहे. ही दरवाढ रद्द करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ. चौधरी यांनी केली. याप्रसंगी नासिर काझी, सालीम पटेल, बाबा देशमुख, ज्ञानेश्वर कोळी, शाम तायडे, शफी बागवान, मनोज सोनावणे, जाकीर बागवान, दीपक सोनवणे, मोसीन पिंजारी आदी उपस्थित होते.

 

 

 


Protected Content

Play sound