धरणगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलची माजी विद्यार्थिनी स्नेहल महाजन हिने मेडिकल प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत ५७५ गुण मिळवून एमबीबीएसत प्रवेश निश्चित करून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शाळेच्या वतीने तिचा शाल, बुके, पुस्तक आणि पेन देऊन पी.आर.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरूण कुलकर्णी व मानद सचिव डॉ.मिलिंद डहाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याचवेळी शाळेची माजी विद्यार्थिनी अनुष्का नवनीत सपकाळे हिनेही मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी यश संपादन केले याबद्दल तिच्यावतीने शाळेचे विज्ञान शिक्षक नवनीत सपकाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी पी.आर.हायस्कूल ही जशी ज्ञानवंतांची, गुणवंतांची खाण आहे तशी ती रत्नांचीही खाण असून येथील तळागाळातील विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर आणि मोठमोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत.ही अभिमानाची आणि स्वाभिमानाची बाब आहे. येथील उच्च शिक्षित शिक्षक हे असे विद्यार्थी घडवतात हाच खरा धरणगावचाही मान आणि शान आहे, अशा शब्दांत शाळेचा गौरव केला.
स्नेहल महाजन हिने मनोगत व्यक्त केले. गुरूजनांमुळेच मी यश मिळवू शकले अशी भावना व्यक्त केली. प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी मेजर डी.एस.पाटील यांनी केले तर आभार पर्यवेक्षक कैलास वाघ यांनी मानले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक उमाकांत बोरसे, व्ही.एच.चौधरी, गणेशसिंह सूर्यवंशी यांच्यासह शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी बंधू योगेश नाईक, मिलिंद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे यांनी परिश्रम घेतले.