यशस्वी आदिवासी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सातारा (वि प्र) आदिवासी कल्याण व संवर्धन संस्था (रजि) महाराष्ट्र राज्य ह्या संस्थेच्या वतीने इयत्ता १० वी व १२वी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांतर्गत राज्यातील इयत्ता १० वी व १२ वी शालांत परीक्षेत उज्वल यश मिळवलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव’ तसेच ‘करिअर मार्गदर्शन’ करण्याचे योजिले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना अविनाशजी ठोंबरे, संस्थापक अध्यक्ष आदिवासी कल्याण व संवर्धन संस्था हे व सोबत नितीनजी साबळे, लहुराज पांढरे, संचालक, कलासागर अकादमी वाई, हेमंत काळोखे, संचालक, कलासागर अकादमी वाई, श्रीमती पुनम घायाळ, गृहपाल, आदिवासी विकास विभाग मुलींचे वसतिगृह कराड हे मार्गदर्शन करणार आहेत.

सदर कार्यक्रम रविवार दिः १६ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता रोजी मुरलीधर मंगल कार्यालय, श्री कृष्णाबाई संस्थान चक्रेश्वर घाट ब्राह्मणशाही वाई ताः वाई जिल्हा सातारा (धुंडी विनायक मंदिरा समोर, पीआर चौक) येथे होणार असून सदर कार्यक्रमाचा आदिवासी विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन : श्री. संपत सूर्यवंशी मो. नंः ९८८१४६६९५८ आदिवासी कल्याण व संवर्धन संस्था यांनी केले आहे.

Protected Content