जळगाव प्रतिनिधी । येथील मुळजी जेठा महाविद्यालयात आज दि. 28 ऑगस्ट रोजी भाषा, सामाजिक शास्त्र, वाणिज्य व विज्ञान शाखेचे प्रशाळा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेझेंटेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उदघाटन वाणिज्य विद्याशाखा प्रशाळेचे संचालक प्रा.वाय.ए. सैंदाणे यांनी केले. या कार्यशाळेत डॉ. योगिता चौधरी, अ.र.भा.गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सुमारे ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत या कार्यशाळेचा लाभ घेतला आहे. कार्यशाळा यशस्वी पार होण्यासाठी प्रा.डॉ.उज्वला भिरूड (कार्यशाळा समन्वयक), प्रा. जयेश पाडवी, अविनाश तायडे, विकास मोरे यांनी अथक परिश्रम घेतले.