Home Cities जळगाव बेंडाळे महिला महाविद्यालयात ‘माय क्लिक’ फोटो स्पर्धेचे आयोजन

बेंडाळे महिला महाविद्यालयात ‘माय क्लिक’ फोटो स्पर्धेचे आयोजन

0
23

bendale clg

जळगाव प्रतिनिधी । शहरातील डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थीनींसाठी फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी विभागाच्या वतीने ‘माय क्लिक’ या संकल्पनेतून युनिक फोटो स्पर्धा दि. ४ ते ९ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थीनींनी आपली कल्पकता छायाचित्रातुन प्रकट करावी, यासाठी ‘माय क्लिक’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा कालावधी ४ ते ९ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार असून स्पर्धेसाठीचा फोटो कॅमेऱ्याने काढलेला असल्यास ८ बाय १२ इंच तर मोबाईलने काढलेला असल्यास ५ बाय ७ इंच आकारामध्ये असावा. स्पर्धकाने मुळ फोटो प्रिंट करून जमा करावा, सहभागी विद्यार्थींनींनी फोटो मोबाईल किंवा कॅमे-याने दोन्हीत काढलेले असावेत. परिक्षणासाठी मुळ फोटो कॅमेरा अथवा मोबाईलमध्ये जतन केलेले असावे. या स्पर्धेसाठी प्रवेश फ्री ५० रुपये असून उत्कृष्ट फोटोसाठी ‘बेस्ट युनिक फोटो अवार्ड’ -२०१९ दिला जाणार आहे. प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविणा-या विद्यार्थींनींना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत विद्यार्थीनींनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound