अहमदाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे आज पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अहमदाबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हिराबेन यांचा १८ जून रोजी १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. मोदी यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करून ते अहमदाबादकडे रवाना झाले आहेत. या महिन्यात ते ४ डिसेंबर रोजी गांधीनगरमध्ये त्यांच्या आईला भेटले होते. यावेळी त्यांनी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या, यानंतर त्यांनी आईच्या पायाला स्पर्श करत आशीर्वाद होते.
मोदींचे ट्विटवरून आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी हिन्दीमध्ये ट्विट करत लिहिले आहे की, “शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है”.