सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधना झाल्याने आज सावदा नगरपालिकेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने दादांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

प्रशासकीय भवनात शोकाकुल वातावरण :
नगरपालिका कार्यालयात आयोजित शोक सभेत नगराध्यक्षा सौ. रेणुका पाटील यांनी अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सावदेवासियांच्या वतीने आदरांजली वाहिली. यावेळी नगराध्यक्षांनी दादांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली.

सर्वपक्षीय नगरसेवकांची उपस्थिती :
या प्रसंगी उपनगराध्यक्ष फिरोज खान पठाण, राजेश वानखेडे, नगरसेवक पंकज येवले, सचिन बऱ्हाटे, नकुल बेंडाळे, श्याम अकोले, रेखा वानखेडे, सिमरन वानखेडे, रंजना भंगाळे, जयश्री नेहेते यांच्यासह विजया जावळे, प्रतीक्षा भंगाळे, सुभद्राबाई बडगे, विशाल तायडे, संगीता लोखंडे, सुनिता तायडे, बंटी जंगले, सुरज परदेशी, विशाल कोळी, वेडू लोखंडे आणि मनीष भंगाळे उपस्थित होते. या शोकसभेत नगरपालिकेच्या कर्मचारी वृंदानेही मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन मिनिटे स्तब्धता पाळली. “प्रशासनावरील हुकमत आणि अष्टपैलू नेतृत्व असलेल्या नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे,” अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.



