पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरातील शिक्षण क्षेत्रात नागरिक शिक्षण मंडळ संचलित, एन.ई.एस.हायस्कुल हे नामवंत विद्यालय आहे. या ठिकाणी विद्यार्थी-विद्यार्थीनींची संख्या मोठी असुन हे विद्यालय शहरातून जाणाऱ्या जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ लगत आहे. येथील दैनंदिन महामार्गावरून रहदारी करणाऱ्यांसह येथे या विद्यालयात येणारे शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी यांसह लगतच असलेल्या बाजारपेठेमुळे येथे दैनंदिन वर्दळ असते.
अशात या विद्यालयात प्रवेश करणारा मुख्य रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली होती. येथून पावसाळ्यात विद्यार्थी, पालक, शिक्षक यांसह सर्वांचीच रस्त्याअभावी फजिती होतांना दिसत होती. या रस्त्याचा सुधारणेचा मंडळ विश्वस्तांनी आमदार चिमणरावजी पाटील यांचेकडे मागणी केली होती. याची आमदार चिमणराव पाटील यांनी तातडीने दखल घेत आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला.
आज १० ऑगस्ट शनिवार रोजी आमदार चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते व ना.शि.मंडळाचे चेअरमन मिलिंदभाऊ मिसर यांच्या अध्यक्षतेखाली भुमीपुजन सोहळा व त्याअनुषंगाने आयोजित लिलाबाई खंडेराव वैद्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जि.प.मा.कृषि सभापती डॉ. दिनकर पाटील, मंडळांचे उपाध्यक्ष केशवआण्णा क्षत्रिय, सचिव ॲड.अभिमन बागुल, संचालक नितीन भोपळे, नगराध्यक्ष अशोक वाणी, शेतकी संघाचे अध्यक्ष विजुआबा पाटील, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, देवगांव सरपंच समीर पाटील, योगेश पाटील, कैलास पाटील यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते.