नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानी पोहोचलेल्या खासदारांची संपूर्ण यादी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी राष्ट्रपती भवन आणि दिल्लीत कडेकोट बंदोबस्तासह तयारी सुरू आहे. सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी मोदींसह त्यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख सहकाऱ्यांचाही शपथविधी आज संपन्न होईल. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५२, १९५७ आणि १९६२ अशा तीन निवडणुकांमध्ये बहुमत गाठून सलग तीनदा पंतप्रधानपद भुषविले होते. त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरत आहेत. भाजपाचे नेते अमित शाह, जेपी नड्डा, बीएल वर्मा, पंकज चौधरी, शिवराज सिंह चौहान, अन्नपूर्णा देवी, अर्जून राम मेघवाल आणि रक्षा खडसे हे नरेंद्र मोदी यांच्या ७ केएलएम निवासस्थानी पोहोचले आहेत.

संभाव्य मंत्रिपदासाठी ज्या ज्या खासदारांना नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बोलाविण्यात आले आहे. त्यांची यादी खालीलप्रमाणे. भाजपाचे खासदार – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, (ओडिशा) केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, (धारवाड, कर्नाटक) बंदी संजय कुमार, (करीमनगर, तेलंगणा) हर्ष मल्होत्रा, (पूर्व दिल्ली) श्रीपाद नाईक, (उत्तर गोवा) अजय टम्टा, (उत्तराखंड) अर्जुन राम मेघवाल, (राजस्थान) सुरेश गोपी, (केरळ) माजी मंत्री हरदीप सिंग पुरी, रवनीत सिंग बिट्टू, (पंजाब) नितीन गडकरी, (महाराष्ट्र) पियुष गोयल, (महाराष्ट्र) रक्षा खडसे, (महाराष्ट्र) रामदास आठवले, (महाराष्ट्र)

एनडीए मधील घटक पक्ष – एचडी कुमारस्वामी, (जेडीएस, कर्नाटक) रामनाथ ठाकूर, (जेडीयू, बिहार) राम मोहन नायडू, (टीडीपी, आंध्र प्रदेश) चंद्र शेखर पेम्मसनी, (टीडीपी, आंध्र प्रदेश) जीतन राम मांझी, (हिंअमो, बिहार) प्रतापराव जाधव, (शिवसेना शिंदे गट, महाराष्ट्र)

Protected Content