जळगाव प्रतिनिधी । विधानसभेच्या निवडणुकीसाठी सकाळी सात वाजेपासून प्रारंभ झाला असून प्रारंभी अनेक ठिकाणी निरूत्साह दिसून आला असून काही ठिकाणी मतदान यंत्रातील बिघाडामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
जिल्ह्यातील ११ मतदारसंघांमध्ये आज सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू झाले आहे. आज बर्याच ठिकाणी रिमझीम पाऊस पडत असल्यामुळे मतदारांमध्ये निरूत्साह दिसून येत आहे. यातच मतदान करतांना काही ठिकाणी अडचणी आल्याचेही स्पष्ट झाले. शहरातील अयोध्यानगरातील बूथ क्रमांक २१९ मध्ये मतदान यंत्रात किरकोळ बिघाड झाल्याने सुमारे १५ मिनिटे मतदान थांबवावे लागले. वरिष्ठ अधिकार्यांनी लागलीच मतदान सुरळीत केले. धरणगाव तालुक्यातील पथराड येथेही मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ गोंधळ उडाला. तर रावेर येथे मॉक पोल दरम्यान काही मशिन्स बरोबर काम करत नसल्याने त्यांना बदलण्यात आले.