पाचोरा (प्रतिनिधी) येथील एका हॉस्पिटलमधील २० वर्षीय नर्सला दोघा जणांनी अज्ञातस्थळी सोबत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार येथील पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली आहे.
त्या तक्रारीनुसार शहरातील हनुमान नगरातील रहिवासी गोविंद दत्तू पुजारी व नुरा फत्तू पटेल या दोघांनी सदर महिलेस शहरातील जारगाव चौफुली येथून अज्ञातस्थळी सोबत नेले व तिच्यावर बलात्कार केला, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पो.स्टे. ला गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान येथील पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी माहिती घेतली असून अधिक तपास पोलीस कर्मचारी दत्ता नरवाडे करीत आहेत.