पतसंस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तक्रारदाराचे आमरण उपोषण

जळगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सावदा येथील लोकसेवा नागरी सहकारी पतसंस्था आणि महालक्ष्मी नागरी पतसंस्थेत झालेल्या कथीत भ्रष्टाचाराची चौकशीसाठी तक्रारी देवूनही प्रशासनाकडून कोणतीच दखल न झाल्याने स्वातंत्र्यदिनी मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपासून तक्रारदार राजेंद्र पाटील हे उपोषणाला बसले आहे.

 

दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, रावेर तालुक्यातील सावदा येथील लोकसेवा नागरी सहकारी पतसंस्था आणि महालक्ष्मी नागरी पतसंस्थेत झालेल्या कथीत भ्रष्टाचार झालेला आहे. याची चौकशी करण्यात यावी यासाठी तक्रारदार राजेंद्र रमेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना लोकशाही दिनात आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रारी केलेल्या आहे. परंतू शासनस्तरावरून या तक्रारीची कोणतीही चौकशी अथवा दखल घेण्यात आलेली नाही, त्यामुळे लोकशाही व लोकशाहीचा धज्जा उडविला असून माहिती अधिकाराच्या अर्जाला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे तक्रारदार राजेंद्र पाटील यांनी सांगितले. या अनुषंगाने राजेंद्र पाटील यांनी मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपासून आमरण उपोषणाला बसले आहे.

Protected Content