जामनेर प्रतिनिधी) । स्पर्धा परीक्षा व जीवनातं यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना समजणे, स्वतःचा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक असल्याचे मत दिपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुवेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.
सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकलव्य शाळेचे जेष्ठ संचालक शिवाजी सोनार, तर प्रमुख पाहुणे म्हणून उमवीचे व्यवस्थापन सदस्य दिपक पाटील, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, गटनेता प्रशांत भोंडे, अभय बोहरा, किशोर महाजन, सृजन कोचिंग क्लास संचालक सिध्दार्थ पाटील व प्राजक्ता पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना महाजन म्हणाले की, स्पर्धा परीक्षामध्ये मूळ संकल्पना समजून स्वतःशीच स्पर्धा करा,पालकांनी घरात खेळीमेळीचे वातावरणात ठेवून कोणतीच अपेक्षा न ठेवता मुलांना शिक्षित करा. परीक्षा ही आपल्या गुणांना वाव देण्याची संधी देते. तसेच पुस्तक वाचविण्याचे महत्व पटवून दिले. यावेळी आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे याच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल जडे यांनी केले तर प्रास्ताविक सिद्धार्थ पाटील यांनी केले.